प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit-Getty Images)

पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे आज जनता हैराण आहे. दिवसागणिक पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत यामुळे जनतेची फरपट होत असताना आता केंद्र सरकारने 19 चैनीच्या वस्तूंवरील, एसी, फ्रिज इ. सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे आता ज्या वस्तू परदेशातून भारतात आयात होत आहेत त्या वस्तू आणखी महाग होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णय मुळे सर्वसामान्य महागाईतही वाढ होणार आहे. ज्या वस्तूंची विक्री होत नाही त्यांचा निर्यात दर कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या निर्णयांतर्गत नवीन वाढलेले दर लागू होईल.

सरकारने ज्या वस्तूंचे दर वाढवले आहेत त्यामध्ये फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, स्पीकर, रेडियल कार टायर, ज्वेलरी, किचन आणि टेबलवेअर, काही प्लास्टिकच्या वस्तू आणि सुटकेसचा इ. समावेश आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य फारच घसरत आहे. त्यामुळे होणारा तोटा नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाउल उचलले आहे.

कम्प्रेसर, स्पीकर आणि बुटांवरही अबकारी करवा क्रमश: 10, 15 आणि 25 टक्क्यांनी वाढवलाय. रेडियल कार टायर वर 10 वरून 15 टक्के कर वाढवलाय. पॉलिश केलेले, सेमी प्रोसेस्ड आणि प्रयोगशाळेत तयार केलेले खडे यावर 5 वर 7.5 टक्के कर वाढवण्यात आलाय.

एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन (10 किलो पेक्षा कमी) वर अबकारी कर 20 टक्काने वाढवलाय. ज्वेलरी, सोनं, चांदीची भांड्यांवर 15 वरून 20 टक्के कर वाढवण्यात आला. तसंच बाथरूमची उत्पादन पॅकिंग साहित्य, किचनच्या वस्तू, ऑफिस स्टेशनरी, सजावट करणाऱ्या शीट, बांगड्या, ट्रंक, सुटकेस आणि प्रवासी बॅकवर 10 ऐवजी 15 टक्के कर वाढवलाय. सरकारने विमानाच्या इंधनावरही 5 टक्के कर वाढवलाय, आधी यावर कोणताही कर नव्हता.