Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

Monsoon Update: देशभरात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, IMD ने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. पुढील 5 दिवसांत केरळ (Kerala) मध्ये मान्सून (Monsoon) सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील IMD ने याबाबत अंदाज जारी केला होता. साधारणपणे केरळमध्ये 1 जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होणार नाही. ते सामान्य तारखेच्या आसपास आहे. कारण केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 1 जून आहे. IMD ने पूर्वी जून ते सप्टेंबर या कालावधीत राहणाऱ्या नैऋत्य मान्सूनमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (हेही वाचा -Cyclone Remal Update: तेलंगणात 'रेमाल' चक्रीवादळाचा प्रभाव, मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू)

'रेमाल' या तीव्र चक्री वादळाच्या आगमनानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. IMD नुसार, बांगलादेश आणि लगतच्या किनारपट्टीवरील पश्चिम बंगालवरील चक्रीवादळ रेमाल गेल्या 6 तासांमध्ये 15 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. आज ते कमकुवत होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -(हेही वाचा -Cyclone Remal Video: विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली, अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती, रेमाल चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस)

उत्तर भारतात उन्हाळी हंगाम सुरू राहणार -

उत्तर भारतात काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस दिल्ली, हरियाणा, राजस्थान पंजाब आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या उत्तर भागात तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे.