Gold Rate Today, April 8, 2024: गुढीपाडवानिमित्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरूसह इतर मेट्रो शहरांतील सोन्याचे दर पहा
Gold | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Gold Rate Today, April 8, 2024: राज्यात सध्या गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) तयारीचा उत्साह पहायला मिळत आहे. नागरिक मराठी नववर्ष (Marathi New Year) साजरे करण्याच्या तयारीला लागले आहेत. परंपरेनुसार, हा सण सोने (Gold )खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे राज्यभरातील सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची लक्षणीय वाढ होत आहे. सध्या सोन्याचा दर हा ७० हजारांच्यावर गेला आहे. त्यामुळे ग्राहक सराफा दुकानांकडे पाठ फिरवतील असे वाटले होते. मात्र तसे चित्र राज्यासह देशभरात पहायला मिळत नाहीये.  (हेही वाचा :Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरात भाव किती? घ्या जाणून )

गुढीपाडवानिमित्त दुकानदार आपली विक्री केवळ छोट्या वस्तूंपुरती मर्यादित ठेवत नाहीत. सोन्याच्या मोठमोठ्या कलाकृती किंवा पूजेसाठीच्या सोन्या-चांदीच्या मूर्तीही नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी सराफा दुकानात जमतात.

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 66,140 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर  72,150 आहेत. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65,340 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर  71,280 आहेत. गुरुग्राममध्ये  22 कॅरेट सोन्याचे दर 65,490 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर  71,440 आहेत. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65,500  आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर  71,430 आहेत. बेंगळुरू 22 कॅरेट सोन्याचे दर 65,340 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर  72,150 आहेत.जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65,940 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर   71,430 आहेत. हैदराबादेत 22 कॅरेट सोन्याचे दर 65,340 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर   71,280 आहेत.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) ने दिलेल्या अहवालानुसार कमोडिटी मार्केटमध्येही तेजी दिसून येते आहे. सोन्याची जोरदार मागणी गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व आणि सोन्याच्या बाजारावरील प्रभाव अधोरेखित करते. गुढीपाडवा सणाच्या उत्सहावर प्रकाश टाकते.