Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, तर चांदीच्या किंमतीतही मोठी घट; जाणून घ्या सोन्याचे आजचे नवे दर
Gold | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Gold Price Today: बुधवारी सोन्या-चांदीच्या वायद्याच्या किंमती खाली आल्या. जून 2021 मध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी 10:19 वाजता सोन्याचा दर 66 रुपये किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून तो 10 ग्रॅम 47,567 रुपयांवर आला होता. मागील सत्रात जूनच्या कराराची सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 47,633 रुपये होती. ऑगस्ट 2021 मध्ये, डिलीव्हरी सोन्याचे दर 87 रुपये म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 48,080 रुपये होते. मंगळवारी, 2021 ऑगस्ट रोजी, डिलीव्हरीचे सोने प्रति 10 ग्रॅम 48,167 रुपये होते. पुण्यात आज चांदीचे दर प्रति ग्रॅम 71.50 रुपये असून 10 ग्रॅम चांदीचे दर 715.00 आहे. (वाचा - Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत आज पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर)

चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)

जुलै 2020 मध्ये सकाळी 10:20 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव 418 रुपये किंवा 0.58 टक्क्यांनी घसरून 71,511 रुपये प्रतिकिलो राहिला. मागील सत्रात जुलैच्या कराराच्या चांदीची किंमत प्रति किलो 71,929 रुपये होती. त्याच वेळी सप्टेंबर 2021 मध्ये चांदीची किंमत 305 रुपयांच्या ब्रेक म्हणजेच 0.42 टक्क्यांसह 72,629 रुपये प्रतिकिलो होती. मागील सत्रात सप्टेंबरच्या कराराचा चांदीचा दर 72,934 रुपये प्रतिकिलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर

ब्लूमबर्गच्या मते, जून 2021 मध्ये कॉमेक्सवरील सोन्याचा दर 6.20 डॉलर किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 1,829.90 डॉलर प्रति औंस झाला. त्याचप्रमाणे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 6.99 डॉलर किंवा 0.38 टक्क्यांनी प्रति औंस 1,830.48 डॉलर होता.