
Petrol Diesel Price: राज्य तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढवल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात 22 ते 25 पैसे वाढ झाली आहे, तर डिझेलच्या किंमतीही 24 ते 27 पैशांनी वाढल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.27 रुपये तर डिझेलची किंमत 81.73 रुपये प्रतिलिटर होती. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.61 रुपये तर डिझेलची किंमत 88.82 रुपये प्रतिलिटर होती. बुधवारी दिल्ली बाजारात पेट्रोल 92.05 रुपयांवर तर डिझेल 82.61 रुपयांवर पोचले.
आज भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100.08 रुपयांवर गेली आहे. प्रीमियम पेट्रॉलची किंमत प्रतिलिटर 103.62 रुपये आहे. काही राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणं बंद झालेलं नाही. (वाचा - Coronavirus in India: देशात आज 4205 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोविड-19 ची लागण)
मोठ्या शहरातील पेट्रोल-डिझेल ची किंमत -
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे आज एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 82.61 92.05
मुंबई 89.75 98.36
कोलकाता 85.45 92.16
चेन्नई 87.49 93.84
सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने पेट्रोल विकतात.
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियनऑयलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.