गोवा (Goa) येथे एका बेरोजगार तरुणाने आपल्याला नोकरी मिळावी म्हणून जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) ही दहशतवादी संघटना हल्ला करणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र तरुणाने केलेल्या फोन नंतर पोलिसांनी या गोष्टीचा अधिक तपास केला असता ती बातमी खोटी असल्याचे समोर आले. या प्रकरणी तरुणाला सीआरपीसी 151 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनय पालवेलकर असे या तरुणाचे नाव आहे. सावंतवाडी येथे राहणाऱ्या विनय याने पाकिस्तान भारताला प्रतिउत्तर देणार असल्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभुमीवर विनय याने जैश-ए-मोहम्मह हल्ला करणार असल्याची आपण माहिती दिल्यास आपल्याला प्रसिद्धी मिळेल असे वाटले. त्यामुळे नावाची प्रसिद्धी होणार या कल्पनेने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
परंतु पोलिसांना जवळजळ पाच तास या घटनेचा तपास केला. तसेच विनय याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्याला नोकरी मिळावी म्हणून हे खोटेनाटे केले असल्याचे कबुल केले. सध्या विनय ह्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून लवकरच त्याच्यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.