मनोहर पर्रिकर यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून मिळाला डिस्चार्ज
मनोहर पर्रिकर यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून मिळाला डिस्चार्ज (Photo Credits-Twitter)

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांना रक्ताची उलटी झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. तसेच पर्रिकर यांच्या छातीत कोणतेही इन्फेक्शन नसल्याचे गोवा सरकारचे प्रवक्ता प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. मात्र प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी (25 फेब्रुवारी) पर्रिकर यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तर आज मंगळवारी पर्रिकर यांची प्रकृती स्वस्थ दिसून आल्याने त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी पर्रिकर यांची प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तसेच पुढील उपचारासाठी आता पर्रिकर यांना लवकरच दिल्ली येथे घेऊन जाणार असल्याचे ही राणे यांनी सांगितले होते.(हेही वाचा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी)

गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गेल्या वर्षभरापासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर अमेरिका, दिल्ली आणि मुंबई येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आला.प्रकृती नाजूक असतानाही मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असून, विधानसभेत उपस्थित राहण्यापासून ते मंत्रिमंडळ बैठक घेण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊनही काम करताना ते दिसत आहेत.