 
                                                                 देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच राजस्थानच्या (Rajasthan) जालोर (Jalore) जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यानंतर त्याने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काही काळापूर्वी आरोपीच्या संपर्कात आला होता. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितावर बलात्कार केला. एवढेच नाही तर, तरुणाने या घटनेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकले. हे देखील वाचा- Hyderabad Suicide Case: हैदराबादमध्ये पतीने दसऱ्यासाठी माहेरी न जावू दिल्याने 26 वर्षीय पत्नीने संपवलं आयुष्य, आरोपीवर गुन्हा दाखल
सायला पोलीस स्टेशनचे एसएचओ ध्रुव प्रसाद यांनी सांगितले की, आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
