Union Budget 2021 चे सर्व अपडेट मिळवा 'या' अॅपवर; असं करा डाऊनलोड आणि इन्स्टॉल
Union Budget App (PC - Twitter)

Union Budget 2021: आज वित्तमंत्री निर्मला सितारामण केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर करणार आहेत. त्यामुळे या बजेटकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. कारण या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून महिला, तरुणांसाठी अनेक घोषणा केल्या जातील. अशातचं तुमचं लक्षदेखील आज सादर होणाऱ्या बजेटकडे लागले असेल. तुम्हाला बजेटसंदर्भातील अपडेट जाणून घ्यायचे असतील, तर यासाठी आपणास वेगवेगळ्या वेबसाइटवर जाण्याची आवश्यकता नाही. परंतु, मोबाइल अ‍ॅपद्वारे आपण संपूर्ण बजेटसंदर्भात अपडेट मिळवू शकता. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक महत्वाच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021 च्या अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण घोषणा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'Union Budget' मोबाइल अ‍ॅप सुरू केले. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. जे आपण Google Play Store आणि अ‍ॅप स्टोअरला भेट देऊन विनामूल्य डाउनलोड करू शकता. (वाचा - Union Budget 2021: आज केंद्रीय अर्थसंकल्प; 11 वाजता लोकसभेत निर्मला सीतामरण मांडणार बजेट)

Union Budget डाऊनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे -

आपण Android फोन वापरकर्ता असल्यास Google Play Store वर जा आणि 'Union Budget' टाइप करा. हे अॅप केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आले असून या खाली NIC eGov मोबाइल अॅप असं लिहिलं आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करा. या अॅपची साईज 21M आहे. हे अॅप Android 5.0 ला सपोर्ट करते.

बजेट संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट अ‍ॅपमध्ये मिळतील -

केंद्रीय अर्थसंकल्पात तुम्हाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण, अॅनुअल फाइनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स, वित्त विधेयक आणि अर्थसंकल्पाच्या मुख्य मुद्द्यांची माहिती मिळेल. म्हणजेच, बजेटशी संबंधित या सर्व माहितीसाठी आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्या स्मार्टफोनमध्ये युनियन बजेट डाउनलोड करा आणि यासंदर्भात सर्व अपडेट्स मिळवा.