Union Budget 2021: आज केंद्रीय अर्थसंकल्प; 11 वाजता लोकसभेत निर्मला सीतारमण मांडणार बजेट

दरम्यान आजचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभा टिव्ही तसेच सरकारी सोशल मीडीया हॅन्डल्सवर लाईव्ह पाहण्याची सोय आहे.

Union Budget 2021: आज  केंद्रीय अर्थसंकल्प; 11 वाजता लोकसभेत निर्मला सीतारमण मांडणार बजेट
Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

नव्या दशकातलं मोदी सरकारचं अधिवेशन 29 फेव्रुवारी ला सुरू झाल्यानंतर आज 1 फेब्रुवारी दिवशी केंद्र सरकार अर्थसंकल्प (Union Budget 2021) मांडणार आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज हा अर्थ संकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत. मोदी सरकार मधील हा त्यांचा तिसरा अर्थसंकल्प असेल. यंदा कोविड 19 पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प हा पेपरलेस असेल म्हणजेच तो डिजिटली सादर केला जाणार आहे. समान्यांनादेखील तो ऑनलाईन पाहता येईल. दरम्यान आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये यंदा आगामी वर्षासाठी जीडीपी ग्रोथ 11% जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थव्यवस्था V आकारात पुन्हा उसळी घेईल असा विश्वास अर्थ मंत्रालयाकडून वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Economic Survey 2020-21: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल, 2021-22 मध्ये GDP वाढीचा दर 11% ची अपेक्षा व्यक्त.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये पहिल्यांदाच केंद्र सरकारला वर्ष भरात काही मिनी बजेट्स सादर करावी लागली. त्यामुळे आजचं बजेट हे त्याच बजेटला पुढे घेऊन जाणारं असेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, तरूणवर्ग, उद्योजक, व्यापारी यांच्या आजच्या अर्थसंकल्पाकडून आशा वाढलेल्या आहेत.

सध्या नोकरवर्गातील लोकांना 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या कमाईवर 10 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर7.5 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान कमवणारे कर्मचारी 15 टक्के, 10 लाख ते 12.5 लाख रुपये असणारे 20 टक्के आणि 12.5 टक्के ते 15 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्ती 25 टक्के टॅक्स भरतात. यामध्ये आता कोणते बदल होणार का? याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष लागलं आहे. Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सध्याचे इनकम टॅक्स, रीबेट्स आणि 2020-21 आयकर दरांबद्दल जाणून घ्या अधिक.

दरम्यान आजचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभा टिव्ही तसेच सरकारी सोशल मीडीया हॅन्डल्सवर लाईव्ह पाहण्याची सोय आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).