Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारी) आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्राचे बजेट सादर करणार आहे. त्यांचे हे तिसरे बजेट असणार आहे. दोन अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांचे यंदाचे बजेट बहुतांशी महत्वाचे आणि ऐतिहासिक असणार आहे. कारण कोरोना व्हायरस सारख्या महासंकटाच्या दरम्यान निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच कारणास्तव नोकर वर्गातील सर्वांसाठी इनकम टॅक्स स्लॅब बद्दल अधिक अपेक्षा आहे की, यावेळी सरकार त्यामध्ये दिलासा देईल किंवा फेरबदल करेल.
सध्या नोकरवर्गातील लोकांना 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या कमाईवर 10 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर7.5 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान कमवणारे कर्मचारी 15 टक्के, 10 लाख ते 12.5 लाख रुपये असणारे 20 टक्के आणि 12.5 टक्के ते 15 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्ती 25 टक्के टॅक्स भरतात. अशातच लोकांचे लक्ष आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर असणार आहे. कोरोना संकटात सुद्धा हाच टॅक्स स्लॅब असणार की त्यात फेरबदल करण्यात येतील याकडे सर्वजण पाहत आहेत. कारण प्रत्येक वर्षात बजेट सादर करताना टॅक्स लॅब मध्ये सरकारकडून बदल करण्यात येतो.(Union Budget 2021: बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी; केंद्र सरकार डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत)
सध्याचे इनकम टॅक्स टेस्ट्स आणि 2020-21 स्लॅब:
Income Per Annum | Existing Tax Rate | New Tax Rate |
Rs 0-2.5 Lakhs | 0% | 0% |
Rs 2.5-5 Lakhs | 5% | 5% |
Rs 5-7.5 Lakhs | 20% | 10% |
Rs 7.5-10 Lakhs | 20% | 15% |
Rs 10-12.5 Lakhs | 30% | 20% |
Rs 12.5-15 Lakhs | 30% | 25% |
Above Rs 15 Lakh | 30% | 30% |
Income Slabs (Individual below 60 years of age) | Tax Rates | Income Slabs (resident & above 60 years but below 80 years) | Tax Rates | Income Slabs (resident & above 80 years) | Tax Rates |
Total income up to Rs. 2.5 Lac | NIL | Total income up to Rs. 3.00 Lac | NIL | NA | NA |
Total income exceeds Rs. 2.5 Lac but less than Rs.5 Lac | 5% on amount exceeding Rs. 2.5 Lac | Total income exceeds Rs. 3 Lac but less than Rs.5 Lac | 10% on amount exceeding Rs. 3.00 Lac | Total income up to Rs. 5 Lac | NIL |
Total income exceeds Rs. 5 Lac but less than Rs.10 Lac | 20% on Income exceeding Rs. 5 Lac + Rs. 25,000 | Total income exceeds Rs. 5 Lac but less than Rs.10 Lac | 20% on Income exceeding Rs. 5 Lac + Rs. 20,000 | Total income exceeds Rs. 5 Lac but less than Rs.10 Lac | 20% on Income exceeding Rs. 5 Lac |
Total income more than Rs. 10 Lac | 30% on Income exceeding Rs. 10 Lac + Rs. 1,25,000 | Total income more than Rs. 10 Lac | 30% on Income exceeding Rs. 10 Lac + Rs. 1,20,000 | Total income more than Rs. 10 Lac | 30% on Income exceeding Rs. 10 Lac + Rs. 1 Lac |
येथे पहा सध्याचा टॅक्स स्लॅब:
दरम्यान, सरकार कडून उद्या जाहीर होण्याऱ्या बजेट बद्दल असे बोलले जात आहे की यामध्ये लोकांकडे लक्ष दिले जाणार आहे. प्रत्येक वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षाचे अर्थसंकल्प फार महत्वाचे असणार आहे. या मध्ये श्रीमंतांपासून ते सामान्य नागरिकांकडे लक्ष दिले जाईल.