General Elections 2024: लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने  जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात भरली 25,000 रुपयांची नाणी
Money (PC- Pixabay)

General Elections 2024: जबलपूर, 20 मार्च आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची योजना आखत असलेले जबलपूरचे रहिवासी बुधवारी उमेदवारी अर्ज भरतांना सुरक्षा ठेव म्हणून 25,000 रुपयांची नाणी घेऊन जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पोहोचला. विनय चक्रवर्ती यांना जबलपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे. त्याने 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपयांचे नाणे जमा करून सुरक्षा ठेव म्हणून 25,000 रुपये भरले आहेत."मी 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपयांच्या नाण्यांमध्ये 25,000 रुपये दिले," ते पत्रकारांना म्हणाले.

पाहा पोस्ट:

चक्रवर्ती म्हणाले की, जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात डिजिटल किंवा ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नाण्यांमध्ये रक्कम भरली.

मला लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवायची आहे, असे ते म्हणाले.

जबलपूरचे जिल्हा रिटर्निंग अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी दीपक कुमार सक्सेना यांनी पत्रकारांना सांगितले की, संभाव्य उमेदवाराने नाण्यांमध्ये केलेले पेमेंट प्राप्त झाले आहे आणि त्याची पावती त्यांना देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.

पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशातील अर्धा डझन जागांवर 19 एप्रिलला मतदान होणार आहे.