Photo Credit- X

Coimbatore: केरळहून कोईम्बतूरला जाणारा एलपीजी टँकर (LPG Tanker) ट्रक अविनाशी रोड उड्डाणपुलावर उलटला. शुक्रवारी सकाळी टँकर उलटल्याची घटना घडली. त्यामुळे गॅस गळती झाली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोईम्बतूरमधील (Coimbatore) उप्पीलीपलायम उड्डाणपुलाजवळ भारत कंपनीचा टँकर उलटला. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

अग्निशमन विभाग आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली आहे. तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोईम्बतूरचे जिल्हाधिकारी क्रांती कुमार पाडी यांनी सांगितले की, ही घटना मध्यरात्रीनंतर पहाटे तीनच्या सुमारास घडली. येथे 18 मेट्रिक टन एलपीजी वाहून नेणारा एलपीजी टँकर उलटला. सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे

अनेक शाळा बंद 

सुरक्षेच्या कारणास्तव अपघात स्थळाच्या 500 मीटर परीसरात असलेल्या सर्व ५ शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी क्रांतीकुमार पाडी यांनी ही घोषणा केली आहे.