प्रतिकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

Bihar Dalit Teenage Girl Gang Rape: उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 20 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातचं आता बिहारमधील गया जिल्ह्यातील दलित किशोरवयीन मुलीवर (Bihar Dalit Teenage Girl) चार नराधमांनी बलात्कार (Gang Rape) केल्याने पीडितेने शुक्रवारी आत्महत्या (Suicide) करून आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चौघांपैकी तीन जणांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. राहुल कुमार, चिंटू कुमार आणि चंदन कुमार असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पीडितेचा मृतदेह गया मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, गया जिल्ह्यामधील कोच भागातील एक 14 वर्षाची मुलगी 29 सप्टेंबर रोजी आपल्या शेजारील मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून घरी परतत होती. यावेळी या मुलीला चार तरुणांनी पळवून नेले. त्यांनी तिच्यावर काही तास सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलगी अर्धवट शुद्धीवर असताना तिच्या कुटुंबियांनी तिला घरी आणले. (हेही वाचा - Sirohi Rape & Murdered Case: राजस्थान येथील सिरोही येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या, फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक)

दरम्यान, पीडित कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रात्री उशीरा घरी आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. जेव्हा कुटुंबियांनी पीडितेचा शोध घेतला त्यावेळी तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने स्वत: ला खोलीत बंद केले. त्यानंतर तिने बराचवेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला. त्यावेळी पीडितेने गळफास घेतला होता. परंतु, कुटुंबियांनी तिला लवकर खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, 1 ऑक्टोबर रोजी पीडितेचा मृत्यू झाला.