Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील उमरिया येथे 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नराधमांनी सलग 4 दिवस केला सामूहिक बलात्कार
प्रतिकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील उमरिया (Umaria) येथे 11 जानेवारी रोजी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची बाब उघडकीस आली आहे. या पीडितेवर नराधमांनी सलग 4 दिवस सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. चार दिवसांनंतर पीडिता जेव्हा घरी आली, तेव्हा हा धक्कादायक खुलासा समोर आला. या घटनेनंतर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. सध्या एक आरोप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मध्य प्रदेशातील उमरिया कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील सुभाषगंज या ठिकाणी ही घटना घडली. 11 जानेवारी रोजी भाड्याच्या घरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी बाजारातून अपहरण केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने 12 जानेवारी रोजी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. (वाचा - Rajasthan: जालोर जिल्ह्यात लोबंकळलेल्या विद्यूत ताराच्या संपर्कात आल्याने बसला भीषण आग; 6 प्रवाशांचा मृत्यू)

दरम्यान, 12 जानेवारी रोजी पोलिसांनी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात कलम 363 आयपीसीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर जेव्हा मुलगी परत आली, तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पीडितेने आपल्यावर 6 ते 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला बाजारातून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर जिल्हा मुख्यालयात असलेल्या एका ढाब्यात पीडितेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. (वाचा - धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये कुत्रीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक)

या घटनेनंतर पीडितेने नराधमांच्या तावडीतून स्वत: ची सुटका करत यासंदर्भात आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 6 आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर आरोपींविरोधात कलम 366(ए), 376(डी)(ए), 376(2)(एन) 3/4 पॉक्सो अॅक्ट, 5 जी/6, 5एल/ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.