पेट्रोल- डिझेल दर वाढ : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला जात आहे. तर पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत शुक्रवारी (17 जानेवारी) ही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल 14 पैशांनी महागले असून 76.11 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल दर 20 पैशांनी वाढला असून ग्राहकांना 67.82 रुपये द्यावे लागणार आहेत.

दिल्ली मध्ये ही पेट्रोल-डिझेल दर वाढीचा फटका बसला आहे. तर पेट्रोल दर 14 आणि डिझेल 19 पैशांनी वधारले आहे. मात्र दिल्लीकरांना पेट्रोलसाठी 70.47 आणि डिझेलसाठी 64.78 रुपये मोजावे लागणार आहेत.( हेही वाचा-पेट्रोल-डिझेल दर वाढ: पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागले)

दरम्यान, 7 जानेवारीपासून सातत्याने इंधन दर वाढ होत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढ केल्याने इंधन दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.