प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नवी दिल्ली, जानेवारी 12 : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्यान दर वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात 19 पैशांनी तर डिझेलचे दर 31 पैशांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 69.26 रुपये प्रती लिटर इतके असून डिझेल 63.10 रुपये प्रती लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 74.91 रुपये प्रती लिटर, तसेच डिझेल 66.04 रुपये प्रती लिटरने महागले आहे.

11 जानेवारीला दिल्लीत पेट्रोल- डिझेलची किंमत 69.07 तर 62.81 रुपये प्रती लिटर होती.तर इंधन दर वाढीमुळे याचा परिणाम पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर झालेला दिसून येत आहे. मात्र 2018 मध्ये दिवाळीनंतर इंधन दर वाढ कायम राहणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाही घसरला. शुक्रवारी भारतीय डॉलर 8 पैशांनी घसरून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 70.4 9 वर बंद झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आधी सांगितले होते की देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे.