LPG Cylinder Rules: 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलिंडरच्या वितरणाचे नियम बदलणार, 'या' शहरांमध्ये OPT शिवाय मिळणार नाही गॅस सिलिंडर; जाणून घ्या
LPG Cylinder (Photo Credit - Wikimedia Commons)

LPG Cylinder Rules: 1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या होम डिलिव्हरीशी संबंधित नियम बदलण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये गॅस वितरण करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (OTP) अनिवार्य असणार आहे. IOCL च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. याची खात्री करण्यासाठी नवीन यंत्रणा आखण्यात येत आहे. या नव्या व्यवस्थेअंतर्गत गॅस बुकिंगनंतर एलपीजी ग्राहकांना ओटीपी मिळेल. यानंतर, जेव्हा डिलिव्हरी बॉय आपल्या घरी गॅस सिलिंडर वितरीत करण्यासाठी येईल, तेव्हा ग्राहकाला त्याला ओटीपीला सांगावा लागेल. ओटीपी शेअर केल्याशिवाय एलपीजी सिलिंडर वितरित केले जाणार नाहीत.

आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली राजस्थानची राजधानी जयपूर आणि तामिळनाडूमधील कोयंबटूर येथे प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे. प्रायोगिक स्तरावर ही योजना यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर 1 नोव्हेंबर 2020 पासून देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये विस्तारित केली जाणार आहे. या शहरांकडून आलेल्या अभिप्रायाच्या आधारे देशभरात या यंत्रणेचा विस्तार केला जाईल, असंही आयओसीएलने स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Aadhaar Card माहिती UIDAI कडे सेफ आहे का? तुमची बायोमेट्रिक आणि इतर माहिती कशाप्रकारे ठेवली जाते सुरक्षित? जाणून घ्या)

दरम्यान, नवीन व्यवस्थेअंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर ग्राहकांना ओटीपी मिळेल. एलपीजी सिलिंडरच्या वेळी ग्राहकांना डिलिव्हरीच्या व्यक्तीला हा ओटीपी दाखवावा लागेल. गॅस वितरण कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला होणार नाही, असं या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. ही नवीन प्रणाली घरगुती सिलिंडर्ससाठी लागू असणार आहे. व्यावसायिक सिलिंडर्सच्या वितरणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.