
आम आदमी पक्षाचे नेते नवीन दास यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचे गुढ उकलले असून, समलिंगी संबंधातूनच नवीन दास यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. समलिंगी संबंध आणि प्रेमातील इर्शेतूनच ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गाझीयाबाद येथील साहिबाबाद येथे गेल्या ५ ऑक्टोबरला नवीन दास यांचा मृतदेह ब्रेजा गाडीत आढळून आला होता.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, समर, तैयब आणि तालीब यांनी अन्नात विष मिसळून ते नवीन यांना दिले. या विषबाधेतूनच त्यांचा मृत्य झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी नवीन यांची गाडी साहिबाबाद नेऊन जाळली. त्यानंतर आरोपींनी नवीन यांच्या अकाऊंटवरुन ५ लाख रुपये आपल्या खात्यावर ट्रान्सफर केले. तसेच, नवीन यांच्याकडे असलेली रोख रक्कमही आरोपींनी लुटली. नवीन आणि त्यांचा मित्र तैयब यांच्या समलिंगी संबंध असल्याची चर्चा आहे. दोघांमधील हे संबंध बऱ्याच काळापासून होते. तसेच, ते एका सुप्रसिद्ध हॉटेलमद्ये गेपार्टीही आयोजित करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नवीन कुमार यांच्या हत्येनंतर राजकिय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आणि चर्चा सुरु होत्या. मात्र, पोलिसांनी या हत्याप्रकरणाचा उलघडा केल्याने उलटसुलट चर्चेवर पडदा पडला आहे.