Former Union Minister Raghuvansh Prasad Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह (Raghuvansh Prasad Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रघुवंश प्रसाद सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
रघुवंश प्रसाद सिंह हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. बिहारच्या राजकारणामध्ये त्यांची 'रघुवंश बाबू' अशी ओळख होती. मागील काही दिवसांपासून रघुवंश प्रसाद सिंह यांची प्रकृती खालावली होती. प्राप्त माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर चार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. (हेही वाचा - Monsoon Session Of Parliament 2020: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व खासदारांकडे कोविड-19 रिपोर्ट असणं बंधनकारक)
Former Union Minister Raghuvansh Prasad Singh passes away.
He was admitted at All India Institute of Medical Sciences (AIIMS) in Delhi. pic.twitter.com/PbqAEBtkfF
— ANI (@ANI) September 13, 2020
दरम्यान, रघुवंश प्रसाद सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी सिंह यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी रघुवंश प्रसाद सिंह यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकचं खालावली. रघुवंश सिंह यांच्यावर 4 ऑगस्टपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच मागील चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं.