File Image | Parliament of India (Photo Credits: ANI)

Monsoon Session Of Parliament 2020: सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व खासदारांना त्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. कोविड-19 चा रिपोर्ट नकारात्क असल्यास खासदारांना सभागृहात प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी कोविड-19 चाचणी करण्यात आली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांनी 72 तासांच्या आत शासनाने अधिकृत केलेल्या कोणत्याही हॉस्पिटल, प्रयोगशाळेत किंवा संसद भवन संकुलात त्यांची कोविड चाचणी करुन घ्यावी, अशा सूचना उपराष्ट्रपती सचिवालयाने ( Vice President's Secretariat) दिल्या आहेत. (हेही वाचा - Coronavirus Update In India: भारतातील कोरोनाग्रस्तांनी पार केला 47 लाखांचा आकडा; मागील 24 तासात 94,372 नवे रुग्ण)

याशिवाय संसद सचिवालय व संसदेच्या आवारात कार्यरत अन्य एजन्सींचे कर्मचारी जे त्यांच्या कर्तव्यावर असताना संसद सदस्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, रिसेप्शन कार्यालय, संसद भवन येथे गेल्या दोन दिवसांपासून खासदारांचे खासगी कर्मचारी आणि खासदारांच्या वाहनचालकांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.