Coronavirus Update In India: भारतातील कोरोनाग्रस्तांनी पार केला 47 लाखांचा आकडा; मागील 24 तासात 94,372 नवे रुग्ण
Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Update In India: भारतातील कोरोनाग्रस्तांनी 47 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1,114 जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,02,596 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आतापर्यंत 78,586 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतात एकाच दिवसात 70 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारत आहे. (हेही वाचा -  Coronavirus In India: भारतात एकाच दिवसात 70 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारत असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती)

दरम्यान, भारतात शनिवारी एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा नवीन उच्चांक गाठला. शनिवारी सर्वाधिक 81,533 रुग्ण बरे झाले. बरे होणारे देशातील 60% रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या 5 राज्यातील आहेत. काल एकट्या महाराष्ट्रात 14,000 हून अधिक तर कर्नाटकात 12,000 हून अधिक रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत.