Prabhat Jha Dies: मध्य प्रदेशातील भाजप पक्षाचे माजी अध्यक्ष प्रभात झा यांच शुक्रवारी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रभात झा यांच्या निधनाची माहिती मिळताच, भाजप पक्षावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा- भाजपचे नेते बिरबल सिंग यांच्या मुलाकडून वृध्दांना मारहाण, अद्याप कारवाई नाही (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना विमानाने भोपाळहून दिल्लीत आणण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. भाजप पक्षाचे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जायचे. प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी ओळख निर्माण केली. प्रभात झा यांच्या निधनानंतर भाजप पक्षात शोक पसरला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे.
भाजपा के वरिष्ठ नेता, @BJP4MP के पूर्व प्रदेश अध्यक्ष, साथी श्री प्रभात झा जी के निधन का समाचार सुनकर स्तब्ध और दु:खी हूँ।
लोक कल्याण और जनता के हित के लिये उन्होंने सदैव कार्य किया। उनका जाना मेरे लिए व्यक्तिगत क्षति है।
ईश्वर से दिवंगत पुण्य आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान… pic.twitter.com/7ugqXcHffG
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 26, 2024
झा हे मूळचे बिहार येथील सीतामढीचे असून त्यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. २०१० मध्ये भाजपचे दिग्गज नेते यांना प्रदेश युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात झा यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची पुनर्रचना केली. ते दोन वेळा मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदारही होते. राज्य भाजप युनिटमधील एक प्रभावशाली नेते होते.