Today Petrol Diesel Price: सलग 26 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. सलग 26 व्या दिवशी इंधनाच्या (Fuel) दरात कोणताही बदल झालेला नाही, म्हणजेच तुमच्या वाहनाची टाकी भरण्यासाठी तुम्हाला अजूनही जुनी किंमत मोजावी लागणार आहे. मुंबईत (Mumbai Fuel Rate) 1 लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आणि डिझेलची किंमत  94.14 रुपये आहे. त्याचवेळी, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमतीत वाढ झाली आहे. सततच्या घसरणीनंतर आज कच्च्या तेलात वाढ होत आहे. श्रीगंगानगरमध्ये सध्या पेट्रोलची किंमत 112.11 रुपये प्रति लीटर आहे. सध्या सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्येच विकले जात आहे.

याशिवाय जयपूरमध्ये 107.06 रुपये, भोपाळमध्ये 107.23 रुपये, पटनामध्ये 105.90 रुपये आणि नोएडामध्ये 95.51 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109.98 रुपये, तर डिझेलचा दर 94.14 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101.40 रुपये आणि डिझेलचा दर 91.42 रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज डब्ल्यूटीआय क्रूडच्या  किमती 1.33 टक्क्यांनी वाढल्या आहेत, त्यानंतर येथे डब्ल्यूटीआय क्रूड 70.88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडच्या किंमती 1.05 टक्क्यांनी वाढताना दिसत आहेत, त्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.21 डॉलर वर पोहोचली आहे. हेही वाचा  Sovereign Gold Bond Scheme 2021-22 Series VIII ची होणार आजपासून सुरूवात; इश्यू प्राईज 4791 प्रतिग्राम

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाची सरासरी किंमत आणि परकीय चलन दर यांच्या आधारावर तेल कंपन्या गेल्या १५ दिवसांत दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात. इंडियन ऑइल सारख्या तेल विपणन कंपन्यांद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचे दररोज पुनरावलोकन केले जाते आणि कोणतीही सुधारणा सकाळी 6 वाजल्यापासून लागू केली जाते.