Sovereign Gold Bond Scheme 2021-22  Series VIII ची होणार आजपासून सुरूवात;  इश्यू प्राईज 4791 प्रतिग्राम
Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Sovereign Gold Bond Scheme 2021-22 - Series- VIII ची आज (29 नोव्हेंबर) पासून सुरूवात झाली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍यांसाठी आजपासून 3 डिसेंबर पर्यंत सब्स क्रिप्शन खुलं करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षातील आठव्या सीरीज मधील ही गुंतवणूक पाच दिवस खुली झाली आहे. यामध्ये ग्राहकांना प्रतिग्राम सोन्यासाठी 4791 रूपये किंमत ठरवण्यात आली आहे.

आरबीआय च्या माहितीनुसार, यंदाच्या सीरीज साठी नॉमिनल व्हॅल्यू 4791 रूपये प्रतिग्राम आहे. यामध्ये केंद्र सरकारशी सल्लामसलत करून गुंतवणूकदारांना आरबीआय 50 रूपयांचे डिस्काऊंट देखील देण्यात आले आहे. हे केवळ ऑनलाईन पेमेंट करणार्‍या अर्जदारांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे डिजिटल मोड द्वारा व्यवहार करणार्‍यांसाठी गोल्ड बॉन्डची इश्यू प्राईज प्रतिग्राम साठी 4741 रूपये असणार आहे. नक्की वाचा:Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?  

मागील सीरीज मध्ये गोल्ड बॉन्ड मध्ये इश्यू प्राईज 4761 रूपये प्रतिग्राम आहे. आरबीआय भारत सरकारच्या वतीने हे बॉन्ड्स उपलब्ध करून देतात. या बॉन्डचा कालावधी 8 वर्षांचा आहे. पाच वर्षांनंतर या प्लॅन मधून एक्झिट ऑप्शन दिला जातो सहा महिन्यांच्या कालावधीने ग्राहकांना 2.50% प्रमाणे पैसे दिले जातात. या बॉन्ड मध्ये किमान 1 ग्राम सोन्याचा पर्याय उपलब्ध आहे. कमाल मर्यादा 4 किलो एका व्यक्तीला आहे. तर ट्र्स्ट साठी 20 किलो आहे. फिजिकल गोल्ड प्रमाणे यामध्ये देखील केवायसी नॉर्म्स लागू असणार आहेत.

भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा गोल्ड बॉन्ड स्कीम जाहीर केली होती. यामध्ये फिजिकल गोल्ड खरेदी करण्यासाठी असलेली मागणी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. दरम्यान बॉन्ड्स हे शेड्युल कमर्शिअल बॅंक, Stock Holding Corporation of India Limited, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज द्वारा विकत घेतले जाऊ शकतात.