शहीद जवानांच्या विधवा पत्नींना मिळणार 50 टक्के किमतीमध्ये फ्लॅट; ST-SC लोकांसाठीही योजना लागू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) स्वस्त दरांत लोकांना फ्लॅट (Flat) उपलब्ध करून देणाऱ्या डीडीए (DDA) बोर्डाची एक महत्त्वपूर्ण बैठक, शुक्रवार 14 जून पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. या बैठकीदरम्यान भारतीय सेनेच्या शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी एक योजना तयार करण्यात आली. या योजनेद्वारे त्यांना डीडीए फ्लॅट 50 टक्के किमतीमध्ये उपलब्ध करून दिले जातील. यासोबतच एससी-एसटी (ST-SC) लोकांसाठी ही एक महत्वाची योजना तयार केली गेली.

डीडीएच्या बैठकीत निर्णय घेतला गेला आहे की, जवळजवळ 1500 फ्लॅट शहिदांच्या विधवा पत्नींसाठी आणि एससी-एसटी लोकांसाठी उपलब्ध करून दिले जातील. या योजनेसाठी नवीन फ्लॅट तयार केल्या जाणार नाहीत, तर जुन्या योजनांमध्ये जे फ्लॅट्स शिल्लक आहेत तेच स्वस्त दरांत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दिल्लीचे उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली

या बैठकीत वॉकेबिलिटी प्लॅनच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. या प्लॅन अंतर्गत पीडब्ल्यूडी, नगर निगम, एनडीएमसी, दिल्ली मेट्रो, ट्रॅफिक पोलिस, डीएसआयआयडीसी आणि यूटीपीक एकत्र येऊन आपल्या परिसरातील फुटपाथचे काम पूर्ण करणार आहेत. तसेच जुने फुटपाथ चालण्यालायक बनवणार आहेत या बैठकीत हे देखील ठरवण्यात आले की, जवळपास 500 फ्लॅट्स हे फक्त एससी-एसटी लोकांना उपलब्ध करून दिले जातील. या फ्लॅट ची किंमत ही जुन्या योजनेनुसार आकारण्यात येणार आहे.