Uttar Pradesh Shocker: पाच वर्षाच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अमरोह येथील दुर्दैवी घटना
Heart Attack PC Twitter

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात अमरोह जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुलगी मोबाईलवर कार्टून पाहताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना अमरोह जिल्ह्यातील हसनपूर येथील कोतवाली येथे घडली आहे. मुलगी आईच्या शेजारीच बेडवर झोपलेली असताना अचानक तिच्या हातातून फोन पडला आणि ती बेशुध्द झाली. तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर सामुदायिक आरोग्य केद्रांच्या अधिकाऱ्यांनी मुलीचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला असावा असी माहिती दिली. कामिनी असं  मृत मुलीचे नाव आहे. आई सोबत शुक्रवारी बेडवर असताना ती कार्टून पाहत होती, तेव्हा अचानक तिच्या हातातून मोबाईल पडला आणि ती बेशुध्द पडली. तीला घरांनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि मृत्यूचे कारण  ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

आईच्या सांगण्यावरून मुलगी पूर्णपणे निरोगी होती. शनिवारी मुलीवर गंगा घाटात अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुखांचे डोंगर कोसळला आहे. या घटनेवर मुलीचे कुटुंब विश्वास ठेवत नाही.