गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) येथील एका शेतात रविवारी रात्री पाच नराधमांनी एका महिलेवर तिच्या प्रियकरासमोर सामूहिक बलात्कार (Gangrape) केला. तसेच मोबाईल घेऊन पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, 27 वर्षीय पीडित मुलगी रात्री 8 च्या सुमारास रस्त्याच्या कडेला तिच्या प्रियकरासोबत बसली होती. जेव्हा पुरुष आले आणि त्यांनी जोडप्याला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. जेव्हा त्या व्यक्तीने नकार दिला तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली आणि बांधले. दोघांना जवळच्या शेतात नेले. जेथे त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.
पीडितेने नंतर तिच्या बहिणीसमोर हा त्रास उघड केला. तिने सोमवारी संध्याकाळी पोलिसांशी संपर्क साधला आणि पाच अनोळखी तरुणांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एका पोलीस निरीक्षकाने सांगितले की, आम्ही गुन्हा नोंदवला आहे आणि पाच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे. आम्ही महिलेच्या प्रियकराचा जबाबही घेतला आहे. हेही वाचा Suicide: आर्थिक विवंचनेला कंटाळून जोडप्याने घेतला फाशीचा निर्णय, जास्त वजनामुळे तुटली दोरी, पत्नी बचावली, पतीचा मृत्यू
महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी बिहारी हिंदी भाषेत बोलत होते. आम्ही आमची टीम जवळच्या कामगार वसाहतींमध्ये पाठवली आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत. आज स्मिमर रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. IPC कलम 376(d) (सामूहिक बलात्कार), 284 (सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारे गुन्हे) आणि 506(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.