सातत्याने 12 तास Netflix वर असायचा, आजारपणाने तरुणाला ग्रासले
नेटफ्लिक्स (फोटो सौजन्य- Pixabay)

सध्याची तरुण मंडळी ही सातत्याने मोबाईलवर दिसून येतात. तसेच त्यांचा दिवसातील बरासचा वेळ ते सोशल मीडियावर घालवतात. मात्र तरुणांच्या अशा प्रकारामुळे बंगळुरुमध्ये राहणाऱ्या मुलाला दिवसातून चक्क 12 तास नेटफ्लिक्स (Netflix) पाहण्याची सवय लागली. त्यानंतर त्याच्या या सवयीचे रुपांतर आजारपणामध्ये झाले आहे.

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाला नेटफ्लिक्स सातत्याने कालांतराने सवय लागली. मात्र या सवयीचे परिणाम त्याच्या आरोग्यावर झाले आहेत. तर बंगळुरु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अॅन्ड न्यरोसायंसमध्ये या तरुणाच्या आजारावर उपचार केले जात आहेत. तसेच उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी त्याची 6 महिन्यांपूर्वी नोकरी गेली होती. त्यामुळे तरुणाला दिवस कसा पुढे ढकलायचा म्हणून त्याने नेटफ्लिक्सवरील व्हिडिओ पाहण्यास नियमित सुरुवात केली. मात्र या व्हिडियोची सवय तरुणाला इतकी लागली की, तो दिवसातील 10-12 तास सातत्याने त्यावरील व्हिडिओ पाहण्यात गुंग व्हायचा. या तरुणाच्या अशा प्रकारामुळे तो घरातील मंडळींना त्याचे वागणे पटत नसल्याने त्याचे घरातल्यांशी वाद व्हायचे असे त्याच्या आईने डॉक्टरांना सांगितले आहे.

या घटनेमुळे तरुणावर मानसिक परिणाम झाले आहेत. तर भारतात 2 वर्षांआधी आलेल्या या नेटफ्लिक्सने यावर त्यांची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्याची तरुण मंडळी ही मल्टिपल स्क्रिन डिसऑर्डरने ग्रासले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.