Fire Breaks Out in Bihar: पाटणा रेल्वे स्टेशनजवळ हॉटेलला भीषण आग, १२ नागरिकांना वाचवण्यात यश; बचाव कार्य सुरू

Fire Breaks Out in Bihar: पाटणा येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलंबरजवळ असलेल्या एका हॉटेलला आज गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मिळेलल्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 नागरिकांना वाचवण्यात आले असून त्यांना पीएमसीएचला पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा :Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल)