Video: बाजारात आल्या पाकिस्तानी झेंडा असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या टाइल्स
पाकिस्तानी झेंडा असलेल्या टाइल्स (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. लोक विविध मार्गांनी पाकिस्तानबद्दलचा निषेध व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘जगातील बेस्ट टॉयलेट पेपर’ असे गुगलला सर्च केले असता, पाकिस्तानचा झेंडा दिसत होता. अशात आता गुजरात मधील मोरबी (Morbi) जिल्ह्यातील एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने चक्क ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ लिहिलेल्या टॉलयलेटच्या टाइल्स बाजारात आणल्या आहेत. या टाइल्सवर पाकिस्तानचा झेंडा छापण्यात आला आहे. या टाइल्स बनवण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

सुरेश कौसुंदरा असे या व्यापाराचे नाव आहे. ‘एनएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्या असल्याचे सांगितले आहे. या टाइल्स सार्वजनिक शौचालये बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच अशा टाइल्सची मागणी वाढली तर आम्ही अजून अशा टाइल्सची निर्मिती करू असे त्यांनी सांगितले आहे. तसेच जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आलीच तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत, असे सुरेश यांनी सांगितले. (हेही वाचा: भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला)

सुरेश यांच्या काप्लानेचे सोशल मिडीयावर कौतुक केले जात आहे. अशा गोष्टींमुळे पाकिस्तानला त्यांची जागा आणि लायकी चांगलीच समजेल असे लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय लष्करावर हल्ला झाला होता. यामध्ये 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेनेही या गोष्टीला गंभीरतेने घेतले आहे आणि भारताला या हल्ल्याचा बदला घेण्याची परवानगी दिली आहे.