Cold Wave in Kanpur: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) थंडीची लाट दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. कानपूर (Kanpur) मध्ये गुरुवारी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 17 जणांचा कोणतीही वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थंडीत रक्तदाब अचानक वाढल्याने आणि रक्त गोठणे यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा झटका येत आहे.
कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटच्या कंट्रोल रूमनुसार गुरुवारी 723 हृदयरुग्ण इमर्जन्सी आणि ओपीडीमध्ये आले होते. त्यापैकी 41 रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात हृदयरुग्णांचा थंडीमुळे मृत्यू झाला. (हेही वाचा - Express Train Delay: नागपूरातील दाट धुक्यांमुळे विविध एक्सप्रेस तब्बल चौदा तास उशीरा, जाणून घ्या कुठल्या ट्रेन किती तास उशीरा)
हृदयरोग विभागाचे संचालक प्राध्यापक विनय कृष्णा म्हणाले की, या हवामानात रुग्णांनी थंडीपासून संरक्षण केले पाहिजे. लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मधील एका प्राध्यापकाने सांगितले की, "या थंडीच्या वातावरणात हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांनाच नव्हे तर किशोरवयीन मुलांनाही येत आहे. प्रत्येकाने, वयाची पर्वा न करता, हे लक्षात ठेवले पाहिजे. उबदार कपडे घालून शक्य झाल्यास घरात राहावे," असा सल्लाही तज्ञांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यात थंडी वाढली असून अनेक भागात दाट धुक्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला पाहायला मिळत आहे. दिल्लीचे किमान तापमान तीन अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.