
Udhampur Encounter: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल सतत शोध मोहीम राबवत आहेत. उधमपूरच्या (Udhampur Encounter) दुड्डू-बसंतगडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये (Security Forces)चकमक झाली आहे. बारामुल्लामध्येही लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. त्यांच्याकडून शस्त्रे आणि आयईडी जप्त करण्यात आले आहेत. चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य आणि पोलिसांकडून सतत शोध मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या सखोल शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान, जम्मू पोलिसही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. दरम्यान, सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीची बातमी समोर आली आहे.
जम्मू पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उधमपूरच्या दुड्डू-बसंतगड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सैन्य देखील सतत गोळीबार करत आहे. असे मानले जाते की सैन्याने येथे दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. सैन्य सर्व बाजूंनी दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे.
#BREAKING: Encounter breaks out between terrorists and security forces in Dudu-Basantgarh area of Udhampur, Jammu & Kashmir. Indian Army and J&K Police on the job. Gunfight underway. More details are awaited.
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2025
या चकमकीत दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळ्यांचे आवाज येत आहेत. घटनास्थळी मोठा फौजफाटा उपस्थित आहे. यासोबतच अनेक पोलिस कर्मचारीही सैन्यासोबत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अलर्ट मोडवर काम करत आहे. त्यामुळेच गेल्या 24 तासांत सैन्याची ही दुसरी कारवाई आहे. सैन्याच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सध्या खोऱ्यात 100 हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत.