UPSC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

यूपीएससी ची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर त्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा केवळ 979 जागांसाठी होणार आहे. UPSC CSE 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 फेब्रुवारी दिवशी संपणार आहे.

UPSC CSE 2025 साठी correction window ही February 12 ला उघडली जाईल तर February 18 ला बंद होणार आहे. ही परीक्षा प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा ती फेरींमध्ये होते. त्यामध्ये Civil Services (Prelims) examination 2025 म्हणजेच पूर्वपरीक्षा 25 मे 2025 दिवशी होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात.

UPSC CSE 2025 साठी कसा कराल अर्ज?

  • यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
  • होमपेज वर UPSC Civil Services Prelims Exam 2025 registration link वर क्लिक करा.
  • online registration process पूर्ण करा.
  • आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेले credentials टाका आणि लॉगिन करा.
  • तुमचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती नीट भरा. तुमची फी भरा.
  • अर्ज सबमीट करा

परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा किमान 21 कमाल 32 वर्ष आहे. वयोमर्यादेमध्ये आरक्षित समाजातील उमेदवाराला शिथिलता दिली जाणार आहे.

अनारक्षित श्रेणीतील उमेदवार UPSC CSE साठी सहा वेळा प्रयत्न करू शकतात. OBC उमेदवार नऊ वेळा परीक्षेचा प्रयत्न करू शकतात आणि SC, ST उमेदवारांसाठी प्रयत्नांची संख्या मर्यादा नाही. अर्जाची फी ₹100 आहे. Benchmark Disability श्रेणी असलेल्यांना, महिला/एससी/एसटी उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.