Exam (PC - pixabay)

NEET UG 2024 Exams: देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली NEET UG 2024, आज रविवार, 5 मे रोजी घेण्यात येत आहे. परीक्षेतील फसवणूक आणि हेराफेरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पूर्ण बाह्यांचे शर्ट, डिजिटल घड्याळे, शूज आणि उंच टाचांच्या सँडल परिधान करून परीक्षेला बसण्यास बंदी घातली आहे. तसेच, परीक्षेच्या पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्या तासात उमेदवारांना ब्रेक मिळणार नाही. तसेच, ब्रेकनंतर प्रत्येक उमेदवाराचे बायोमेट्रिक मॅचिंग केले जाईल. देशातील 557 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये एकूण 24 लाख उमेदवार NEET UG परीक्षेला बसतील.

NEET UG परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होईल. दुपारी दीड नंतर उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थी आणि तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बहु-स्तरीय बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह, अर्जामध्ये दिलेली माहिती तपासण्यासाठी AI देखील वापरला जाईल. (हेही वाचा -NEET UG 2024 Admit Card Released: NTA कडून नीट यूजी 2024 परीक्षेचं हॉलतिकीट जारी; neet.nta.nic.in वरून असं करा डाऊनलोड)

परीक्षेच्या पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्या तासात विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही. ब्रेकनंतर प्रत्येक वेळी विद्यार्थ्याची बायोमेट्रिक मॅचिंग केली जाईल. 24 लाख उमेदवारांसाठी देशभरातील 557 शहरांमध्ये आणि 14 परदेशात परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ((नक्की वाचा: Father Cracked NEET With Daughter: प्रेरणादायी! 18 वर्षांची मुलगी आणि 50 वर्षांच्या डॉक्टर वडीलांनी एकत्र पास केली NEET परीक्षा) )

पारदर्शकतेसाठी नियमांत बदल -

NTAचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले की, परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि देखरेख कर्मचाऱ्यांसाठी बहु-स्तरीय बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह अर्जामध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी AI चा वापर केला जाईल. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी NTA NEET ॲडमिट कार्ड 2024 सोबत व्हॅरिफिकेशनसाठी वैध फोटो आयडी पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्रावर ही कागदपत्रे आवश्यक -

  • पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह NEET प्रवेशपत्राची मुद्रित प्रत आणि भरलेला स्व-घोषणा फॉर्म.
  • हजेरी पत्रकात दिलेल्या विशिष्ट ठिकाणी एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा.
  • प्रवेशपत्रासह डाऊनलोड केलेल्या प्रोफॉर्मावर पांढऱ्या पार्श्वभूमीसह एक पासपोर्ट आकाराचा (4X6 इंच) रंगीत फोटो चिकटवा, जो परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकाकडे सोपवावा.

सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले PWBD प्रमाणपत्र, लागू असल्यास.

सरकारी अधिकृत फोटो आयडीपैकी कोणताही एक (मूळ आणि वैध); जसे पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडी/पासपोर्ट/आधार कार्ड/रेशन कार्ड/छायाचित्रासह इयत्ता 12वीचे प्रवेशपत्र/कोणताही वैध फोटो आयडी.