SSC यांच्याकडून CGL, CHSL सह अन्य महत्वाच्या Entrance Exam साठी तारखा जाहीर, येथे पहा परीक्षेचे वेळापत्रक
Exams | Representational Image (Photo Credits: Getty Images)

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्याकडून CGL, CHSL सह उर्वरित परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे स्टाफ सिलेक्शन कमीशनची प्रमुख प्रवेश परीक्षा (Entrance Exam) स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर 21 मे रोजी SSC यांनी एका विधानात असे म्हटले आहे की, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा 1 जून रोजी करणार आहेत. त्यांनी केलेल्या विधानानुसार SSC यांनी काही महत्वाच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत.

Combined Higher Secondary (10+2) स्तरीय परीक्षा 2019 (टियर-19) आता 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तसेच SSC CGL 2019 टियर 2 परीक्षा 14 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबरच्या काळात घेतली जाणार आहे.तसेच एसएससीच्या विविध ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी सुद्धा परीक्षा आयोजित केली जाते. याबाबत एसएससी यांनी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये माहिती दिली होती. आता नव्या वेळापत्रकानुसार यासाठी परीक्षा 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तर कोरोनाची देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.