Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

मुंबई: राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत असुन 1 डिसेंबरपासुन मुंबई महापालिकेने (BMC) ऑफलाईन पहिली ते सातवीचे वर्ग भरावे असा नर्णय घेण्यात आला होता. पण महापालिकेचे शिक्षणधिकारी राजु तडवी (Raju Tadavi) यांनी मुंबई महापालिकेतील शाळा उद्यापासुन सुरु (Mumbai School Reopen) होतील असा आदेश जारी केला आहे. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळा कोणत्याही स्थितीत सुरु होणार आणि त्याच्यात कोणताही बद्दल होणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितेल आहे. तसेच मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसेच या बाबत काही शाळांना माहिती मिळाली नसल्याने त्यांना पुन्हा सुचना दिल्या जाणार आहे असे शिक्षणधिकाऱ्यानी सांगितले आहे.

Tweet

शाळा सुरू करण्यासाठी आज मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक घेण्यात आली, तसेच त्यात काही राहिलेल्या अडचणीवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले. (हे ही वाचा MHADA Exam Paper Leak: म्हाडा परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन; ABVP व NCP चे सदस्य एकमेकांशी भिडले.)

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी शक्यता पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केलंय. शाळेत आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापनाची वर्ग सुरु करण्याची तयारी आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे. काही ठिकाणी ओमायक्रोनच्या भितीने विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या विनंती मध्ये आहे असे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतलीय.