शाळा (Photo Credit: PTI)

सोशल मीडीया मध्ये एका पालकाने आपल्या मुलांच्या शाळेच्या फी चा खर्च मांडला आणि अनेकांना हे आकडे विचारात पाडणारे ठरले आहेत. या व्यक्तीच्या पोस्ट मधील दाव्यानुसार, शाळेने नर्सरीतून एलकेजीमध्ये बदललेल्या चार वर्षांच्या मुलाच्या फीमध्ये तब्बल 65% वाढ लागू केली आहे. TOI च्या वृत्तानुसार, पालकाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबाद मधील Bachupally च्या एका नामांकित शाळेतील आहे. जिथे 2023 मध्ये फी 2.3 लाख होती आणि 2024 मध्ये ती 3.7 झाली आहे. एप्रिल महिन्यामध्ये हा विद्यार्थी आता लोअर केजी मध्ये जाणार आहे.

पालकाने दावा केला आहे की शाळा प्रशासनाने फी वाढीचं समर्थन केलं आहे. शाळेचा अभ्यासक्रम IB curriculum असल्याने फी मधील वाढ अटळ आहे. "आम्ही आमच्या मुलाची नोंदणी केली तेव्हा, तो ग्रेड 1 ला पोहचे पर्यंत फीची रचना तुलनेने स्थिर राहण्याची आम्हाला अपेक्षा होती. पण नर्सरी ते LKG पर्यंतच त्याला नवीन फी ब्रॅकेटमध्ये ठेवण्यात आले जी जवळजवळ 70% जास्त फी आहे" अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिल्याचं वृत्त आहे.

पालकाने असेही सांगितले की त्यांचा मोठा मुलगा जो सध्या चौथी मध्ये त्याच शाळेत आहे त्याची फी 3.2 लाख आहे म्हणजे त्याच्या लहान भावापेक्षा फक्त 50 हजार कमी आहे. आर्थिकदृष्ट्या हे मोठं ओझं आहे. आता कमी वेळेत दुसरी शाळा शोधणं देखील कठीण असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. School: शाळेची फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले, पालकांनी केली कारवाईची मागणी .

सोशल मीडीयातील पोस्ट मुळे इतर पालकांनाही वास्तवाचं भान आलं आहे. अनेकांनी आपणही याच परिस्थितीमधून जात असल्याचं ते म्हणाले आहेत. या शैक्षणिक वर्षात बहुतांश शाळांची सरासरी वार्षिक फी वाढ 10%-12% च्या आसपास असताना, मूळ दर लाखात असताना, शिक्षणाचा एकूण खर्च पुन्हा एकदा वाढला आहे.

शाळांचे प्रशासक आवश्यकतेनुसार शुल्कवाढीचा बचाव करतात. "बहुतेक शाळांनी यावर्षी 8%-10% फी वाढ केली आहे. शिक्षकांच्या पगाराच्या वाढत्या बाजारभावामुळे हे आवश्यक आहे. आम्ही अनुभवी कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धात्मक पगार देऊ केला पाहिजे यासाठी ही फी वाढ होत असल्याची माहिती दिली जाते.