SBI Recruitment 2021: एसबीआयमध्ये 92 फार्मासिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी नोकर भरती, अर्जप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या
SBI (Photo Credits: Facebook)

SBI SCO Recruitment 2021: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण भारतील सर्वात मोठी बँक एसबीआयकडून नोकर भरतीची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर आणि क्लॅरिकल कॅडरमध्ये फार्मासिस्टच्या एकूण 93 पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध भरतीच्या जाहिरातीत विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया 13 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे.(Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बड़ौदा मध्ये नोकरीची संधी, उमेदवारांना 29 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज)

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना लक्षात असू द्या की अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट द्यावी. येथे तुम्हाला नोकर भरतीचा फॉर्म भरता येणार असून अर्जासाठी ठरवलेले शुल्क येत्या 3 मे पर्यंत भरावे लागणार आहेत.(NEET PG 2021: NBE ने नीट पीजी परीक्षेसाठी जारी केले मार्गदर्शक तत्त्वे; विद्यार्थ्यांना पाळावे लागणार 'हे' नियम)

>'या' पदांसाठी होणार नोकर भरती-

-फार्मासिस्ट 67 पद

-डिप्टी सीटीओ 1 पद

-मॅनेजर (हिस्ट्री) 2 पद

-चीफ एथिक्स ऑफिसर 1 पद

-अॅडवाइझर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) 4 पद

-डिप्टी मॅनेजर (स्ट्रेटेजिक ट्रेनिंग) 1 पद

-डेटा अॅनालिस्ट 8 पद

-मॅनेजर (रिस्क मॅनेजमेंट) 1 पद

-मॅनेजर (क्रेटिड अॅनालिस्ट) 1 पद

-सीनियर स्पेशल एक्झिक्युटीव्ह (स्ट्रेटेजी टीएमजी) 1 पद

-सीनियर स्पेशल एक्झिक्युटीव्ह (कॉम्पलीयंस) 1 पद

तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या बेवसाइटला भेट द्यावी. त्यानंतर तेथे करियर सेक्शनमध्ये लेटेस्ट अनाउंन्समेंट येथे क्लिक केल्यास नोकर भरती संबंधित माहिती मिळेल.  तेथे तुम्हाला नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक सुद्धा दिल्या असतील.