Job | File Photo

Sarkari Naukri 2020 Live Updates: अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तुम्हीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सध्या RRB, SSC, शिक्षक, रेल्वे पोलिस, इंडियन ऑयल, आदी पदासाठी मेगाभरती ची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे या मेगाभरतीमध्ये तुम्हाला नशीब आजमवण्याची सुवर्णसंधी आहे. आज या लेखातून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहचू शकता. यासाठी तुम्हाला खालील पदासाठी लवकरात-लवकर अर्ज करायचा आहे.

खाली दिलेल्या विविध पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला वय, शिक्षण आदी अटींची पुर्तता करावी लागणार आहे. तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीअगोदर तुम्हाला या पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. (हेही वाचा - Sarkari Naukri Eastern Railway Apprentice Recruitment 2020: 8वी पास उमेदवारांसाठीदेखील रेल्वेत सरकारी नोकरची संधी, rrcer.com वर करा 4 एप्रिलपर्यंत अर्ज)

इंडियन ऑयल मेगाभरती -

इंडियन ऑयल (Indian Oil) मध्ये सरकारी नोकरी (Sarkari Naukri) करण्याची वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. इंडियन ऑयलमध्ये भर्ती निघाली आहे. IOCL ने जारी केलेल्या सुचनेनुसार 500 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी वय वर्ष 24 असणारे तरुण अर्ज करू शकतात. हा अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 20 मार्च असणार आहे.

शास्त्रज्ञ पदासाठी भरती -

नेशनल इंस्टीट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी (National Institute of Electronics & Information Technology) ने साइंटिस्ट म्हणजेच शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज मागवले आहेत. NIELIT ने जारी केलेल्या जाहीरातीनुसार 495 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तुम्ही 26 मार्च पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकता. या जाहीरातीमध्ये Scientist - ‘B’ Group ‘A’ आणि Scientific/Technical Assistant - ‘A’ Group ‘B’ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

टीजीटी शिक्षक भरती -

Haryana Staff Selection Commission (HSSC) ने 1137 टीजीटी शिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार या पदासाठी 24 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी निवड लिखित परीक्षेच्या आधारावर असणार आहे. ही परीक्षा 90 मार्कांची असणार आहे. या पदासाठी उमेदवार 3 मार्च, 2020 पर्यंत अर्ज करु शकतात.

SSC मध्ये 1355 पदांची भरती -

Staff Selection Commission Recruitment ने 1355 पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवारांना तीन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. उमेदवार या पदासाठी 20 मार्च 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

शिक्षक पदासाठी भरती -

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी 'पंजाब शिक्षा भर्ती बोर्ड' ने 1600 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ETT Teacher Recruitment 2020 ने जाहीर केलेल्या पदभरतीसाठी उमेदवार 25 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांचे वय 37 वर्ष असणं गरजेचं आहे.