RRC Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत 3591 पदांसाठी नोकर भरती, 10 वी पास आणि आयटीआय करु शकतात अर्ज
Western Railway (Photo Credits: File Photo)

RRC Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेकडून नोकरी संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आरआरसीच्या विविध विभागात अप्रेंटिसशिपच्या रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आरआरसीच्या नोटिफिकेशननुसार. इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक पेंटर, पाइप फिटर, प्लंबर, ड्राफ्टमॅन, पासा, वेल्डर, डिझेल मॅकानिकसह अन्य पदांवर एकूण 3591 रिक्त पद भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 मे 2021 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी rrc-wr.com वर जाऊन अर्ज करावा. वेबसाइटवर ऑनलाईन अर्जाची लिंक 25 मे रोजी सकाळी 11 वाजता उपलब्ध असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2021 दिली आहे.

आरआरसी वेस्टर्न रेल्वे भरती 2021 च्या पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून कमीतकमी 50 टक्के गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. या व्यतिरिक्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 15 वर्षापेक्षा खाली आणि 24 वर्षाहून अधिक नसावे. वयाची मोजणी 24 जून 2021 नुसार करण्यात येणार आहे. राखीव वर्गासाठी वयात सूट दिली जाणार आहे.

>>आरआरसी वेस्टर्न रेल्वे भरती 2021:

-मुंबई डिव्हिजन (एमएमसीटी) : 738 पद

-वडोदरा (बीआरसी) डिव्हिजन : 489 पद

-अहमदाबाद डिव्हिजन (एडीआई) : 611 पद

-रतलाम डिव्हिजन (आरटीएम) : 434 पद

-राजकोट डिव्हिजन (आरजेटी) : 176 पद

-भावनगर डिव्हिजन (बीवीपी) : 210 पद

-लोअर परेल (पीएल) डब्ल्यू/शॉप : 396 पद

-महालक्ष्मी (एमएक्स) डब्ल्यू/शॉप : 64 पद

-भावनगर (बीवीपी) डब्ल्यू / शॉप : 73 पद

-दाहोद (डीएचडी) डब्ल्यू/शॉप : 187 पद

-प्रताप नगर (पीआरटीएन) डब्ल्यू/शॉप, वडोदरा : 45 पद

-साबरमती (एसबीआई) इंजीनियरिंग डब्ल्यू/शॉप, -अहमदाबाद : 60 पद

-साबरमती (एसबीआई) सिग्नल डब्ल्यू/शॉप, अहमदाबाद : 25 पद

-हेडक्वार्टर ऑफिस : 83 पद

आरआरसी वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती 2021 साठी उमेदवारांना 10  वी आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. निवड प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.