RBI Recruitment 2021: 'आरबीआय'मध्ये 841 पदांची नोकरभरती, 10 वी पासही करू शकतात अर्ज; जाणून घ्या पदांची नावे व कुठे कराल अप्लाय
JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

भारतामध्ये बँक नोकरी सर्वात सोयीस्कर नोकऱ्यांपैकी एक समजली जाते. यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी बँक परीक्षा देतात. आता बँक नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक मोठी ऑफर आणली आहे. आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडंटच्या (Office Attendant) 841 पदांसाठी नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीची खास बाब म्हणजे यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या अटेंडंट जॉबसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 24 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होत आहे.

यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 मार्च 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटीसनुसार या पदांची परीक्षा 9 आणि 10 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

पदे -

पदांची संख्या – 841 पोस्ट

अनारक्षित पदे- 454 पोस्ट

ओबीसी - 211 पोस्ट

एसटी - 75 पोस्ट

अनुसूचित जाती- 25 पदे

ईडब्ल्यूएस - 76 पोस्ट

शैक्षणिक पात्रता -

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावा. या पदांसाठी बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. मात्र पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत.

वय -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची, एसटी व एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

फी- 

सामान्य श्रेणी, ओबीसी वर्ग आणि ईडब्ल्यूएस अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 450 रुपये फी भरावी लागेल. एसटी व एसटी आणि दिव्यांगसाठी 50 रुपये शुल्क निश्चित केले गेले आहे. (हेही वाचा: Supreme Court Recruitment 2021: सुप्रीम कोर्टात असिस्टंट पदासाठी नोकर भरती, ऑनलाईन अर्जाला सुरुवात)

परीक्षेचे स्वरूप -

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व भाषा परीक्षेच्या आधारे केली जाईल. रिझर्व्ह बँकेच्या या रिक्त जागेसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होईल. या ऑनलाईन परीक्षेत एकूण 120 प्रश्नांसह 120 गुणांचे पेपर असतील. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयांचा समावेश असेल. या चाचणीत नकारात्मक मार्किंगची तरतूद असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. अधिक माहितीसाठी व पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर भेट द्या.