जानेवारी महिना सरला की बोर्ड परीक्षा सुरू होतात. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा करियरचा टर्निंग असतो. दरम्यान या परीक्षांना युद्धाप्रमाणे समजून अनेक विद्यार्थी ताण घेतात. पण हाच ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी खास 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Par Charcha 2023) या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासोबत चर्चा करतात. 'एक्झाम वॉरियर्स' असलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आज 11 वाजता त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या Talkatora Stadium मध्ये हा कार्यक्रम पार पडेल.
परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी आणि निडर पणे या परीक्षा सत्राला सामोरं जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना काही टीप्स देतात. नक्की वाचा: PM Narendra Modi यांनी लिहिलेले Exam Warriors पुस्तक 13 भाषांमध्ये उपलब्ध; विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी आहे खास .
परीक्षा पे चर्चा कुठे पहाल लाईव्ह?
दिल्लीत मर्यादित विद्यार्थीच थेट कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात पण या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील दाखवले जाणार आहे त्यामुळे Ministry of Education च्या ट्वीटर, फेसबूक, युट्युब वर तुम्हांला थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
38 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे त्यामध्ये 16 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाचे आहेत. यंदाचं रजिस्ट्रेशन मागील वर्षीच्या तुलनेत दुपट्टीने अधिक आहे. 155 देशांमधून विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असल्याचं सांगण्यात आले आहे. Talkatora Stadium वर आज सुमारे 2400 विद्यार्थी थेट सहभाग घेणर आहेत. तर करोडो विद्यार्थी त्यांच्या शाळेतही हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकणार आहेत.