Exam (Photo Credits: Facebook)

NTA JEE Main Results 2021: जेईई मेन 2021 च्या तिसऱ्या सेशन मधील निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्ट एजेंसी (NTA) ने जेईई मेनचा निकाल हा अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in येथे पाहता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 ची परिक्षा दिली होती त्यांना या संकेतस्थळावरुन आपला रिजल्ट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल तसापण्यापूर्वी आपली जन्मतारीख आणि अॅप्लिकेशन क्रमांक किंवा पासवर्डच्या मदतीने लॉगिन करावे लागणार आहे.

नॅशनल टेस्ट एजेंसीने 20,22, 25 आणि 27 जुलै रोजी संयुक्त प्रवेश परिक्षेच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन केले होते. जवळजवळ 7.09 लाख विद्यार्थ्यांसाठी कंप्युटरवर आधारित परिक्षा (सीबीटी) रुपात ती आयोजित करण्यात आली होती. एनटीएने पूर्ण देशात 334 शहर आणि 828 केंद्रांवर जेईई मेनची परिक्षा ठेवली होती. तर जेईई मेन 2021 परिक्षेचा निकाल पुढील काही सोप्प्या स्टेप्स वापरुन तुम्हाला पाहता येणार आहे.(ICSI CS Foundation Admit Card 2021 जारी; icsi.edu वरून असं करा डाऊनलोड)

-निकाल पाहण्यासाठी सर्वात प्रथम jeemain.nta.nic.in संकेतस्थळाला भेट द्या.

-वेबसाइटवरील रिजल्ट लिंकवर क्लिक करा.

-आता अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करुन लॉग इन करा.

-तुम्हाला आता निकाल पाहता येईल.

Tweet:

दरम्यान, जेईई मेनच्या चौथ्या सत्राचे आयोजन 26 ऑगस्ट, 27,31 आणि 1-2 सप्टेंबरला करण्यात आले आहे. यासाठी लवकरच अॅडमिट कार्ड जाहीर केले जाणार आहेत. उमेदवारांना jeemain.nta.nic.in याच संकेतस्थळावर अॅडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. दरम्यान, जेईई मेनची परिक्षा काही टप्प्यात पार पाडली जाते. प्रत्येक टप्प्यासंदर्भातील समस्या पाहता एनटीए टक्केवारीच्या गुणांनुसार नॉर्मलाइजेशन प्रक्रियेचे पालन करते.