NEET UG | Representational Image (File Photo)

National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) कडून यंदाच्या NEET PG 2025 परीक्षेच्या तारखेची माहिती देण्यात आली आहे. 17 मार्चच्या जारी नोटीफिकेशन नुसार, ही परीक्षा 15 जून 2025 दिवशी होणार आहे. दोन सत्रामध्ये ही परीक्षा होणार आहे. computer-based test (CBT) format मध्ये ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतचे तपशील NBEMS website - natboard.edu.in वर पाहता येणार आहे. ही परीक्षा Computer Based Platform मध्ये होणार आहे.

NEET PG 2025 परीक्षा 200 मार्कांची multiple-choice questions असणार आहे. यामध्ये चार पर्यायातून एक अचूक पर्याय निवडायचा आहे. उमेदवारांना अचूक पर्यायाची निवड करायची आहे. या परीक्षेसाठी 3 तास 30 मिनिटांचा कालावधी आहे. अचूक उत्तराला 4 मार्क्स मिळणार आहेत तर चूकीच्या उत्तरासाठी 1 मार्क कापला जाणार आहे.

NEET PG किंवा postgraduate medical entrance exam ही MD/MS/PG Diploma आणि Post MBBS DNB courses, 6 Year DrNB Courses आणि NBEMS Diploma courses साठी सिंगल विंडो एंटरन्स एक्झाम आहे.

NEET PG 2025 परीक्षा सकाळी 9 ते 12.30 आणि दुपारी 3.30 ते 7 दरम्यान घेतली जाणार आहे.

दरम्यान या परीक्षेसाठी एप्रिल 2025 पासून रजिस्ट्रेशन सुरू होईल पुढे मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत अ‍ॅप्लिकेशन स्वीकारले जातील. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जातील. CUET UG 2025 Registration Process Begins: NTA CUET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन cuet.nta.nic.in वर सुरू; पहा महत्त्वाचे अपडेट्स .

परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये घेण्याची मागणी  

 

NEET PG 2025 परीक्षा दोन सत्रात जाहीर झाली आहे. परंतू अनेकांकडून ही परीक्षा एकाच सत्रात व्हावी यासाठी मागणी करण्यात आली आहे.  Normalization Process आणि परीक्षेच्या निपष्पातीपणावर अनेकांनी प्रश्नचिन्हं उभी केली आहेत.