NEET PG 2021 Result Declared: नीट परीक्षा निकाल जाहीर; इथे पहा कॅटेगरीनुसार कट ऑफ लिस्ट
निकाल। File image

नीट पीजी 2021 परीक्षा निकाल (NEET PG 2021 Result) आज (29 सप्टेंबर) जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मेडिकल सायंस (NBEMS) ने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी आता nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर पाहता येणार आहे. NEET PG 2021 रिझल्ट पीडीएफ मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये मेरीट लिस्ट मध्ये रोल नंबर, 800 पैकी मिळालेल्या मार्क्स आणि रॅन्क पाहता येणार आहे. दरम्यान नीट परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्यांना MD, MS, Postgraduate Diploma courses साठी शॉर्ट लिस्ट करता येणार आहे.

NEET PG 2021 निकाल कसा पहाल?

  • नीट पीजी 2021 निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • “NEET PG 2021 Result” लिंक वर क्लिक करा.
  • NEET PG Result PDF मध्ये Ctrl+F करून तुमच्या रोल नंबर वरून निकाल पहा.

दरम्यान नीट पीजी क्वालिफाईंग कटऑफ पर्सेंटाईल देखील जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जनरल कॅटेगरी मध्ये कटऑफ 302 आहे. तर SC/ST.OBC (Including PWD)साठी कटऑफ 262 आहे. इथे पहा निकालाची डिरेक्ट लिंक .

NEET PG 2021 कट ऑफ 

एनबीई कडून यंदा नीट पीजी 2021 परीक्षा 11सप्टेंबर दिवशी घेण्यात आली होती. आता लवकरच काऊंसलिंग प्रोसेस सुरू होणार आहे. निकालामध्ये रॅंक आणि मेरीट पोझिशन हे देशभरासाठी 50% कोट्यासह जागांची वेगळी एक यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.