द नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) कडून National Eligibility cum Entrance Test म्हणजेच NEET PG 2021 exam ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा 18 एप्रिल 2021 दिवशी होणार आहे. दरम्यान परीक्षार्थ्यांना याबाबतचे अधिकृत परिपत्रक NBE official वेबसाईट natboard.edu.in वर पाहता येणार आहे.
कम्युटर बेस्ड मोड मध्ये होणारी ही परीक्षा यंदा 18 एप्रिल दिवशी आयोजित करण्यात आली आहे. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर त्यांचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नीट पीजी 2021 परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला 30 जून 2021 पर्यंत किंवा त्याआधी इंटर्नशीप पूर्ण करणं आवश्यक आहे. सोबत इतर पात्रता निष्कर्ष देखील तपासून पाहणं आवश्यक आहे.
ANI Tweet
NEET PG 2021 will be conducted on April 18, 2021, on a computer-based platform at various centres across the country: National Board of Examination pic.twitter.com/x4WAjlrbfA
— ANI (@ANI) January 14, 2021
दरम्यान यंदा NBE ने यंदा विद्यार्थ्यांना वेळोवेळी nbe.edu.in आणि natboard.edu.in या वेबसाईट्सना भेट देण्याचं आवाहन केलं आहे. याद्वारा नीट पीजी बुलेटीन आणि नीट पीजी 2021 अॅप्लिकेशन याची माहिती मिळणार आहे. काश्मीर मधील चौकीदाराच्या जुळ्या मुलांचे NEET 2020 मध्ये घवघवीत यश! पहा आनंदी क्षणांचे फोटोज आणि व्हिडिओ.
NBE ने यंदा सविस्तर नोटिफिकेशन जाहीर केलेल नसले तरीही मागील वर्षीच्या नीट पीजी परीक्षा पॅटर्न नुसार, विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरं जायचं असल्यास त्यांच्या प्रोव्हिजनल किंवा परमनंट एमबीबीएस डिग्री सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सोबतच 30 जूनपूर्वी त्यांनी एका वर्षाचा इंटर्नशीपचा काळ पूर्ण केलेला असावा.