निकाल । File Image

NEET MDS 2025 निकाल जाहीर करण्यात आला आहे. National Board of Examinations in Medical Sciences कडून 19 एप्रिलला घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे. हा निकाल आता natboard.edu.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. NEET MDS 2025 परीक्षा भारतात computer-based test mode माध्यमात घेण्यात आली होती. या परीक्षेच्या गुणांवर Master of Dental Surgery courses ची प्रवेशप्रक्रिया अवलंबून असते.निकालांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र उमेदवारांची यादी आणि श्रेणीनुसार कट-ऑफ गुण समाविष्ट आहेत.

NEET MDS 2025 परीक्षेनंतर NEET MDS 2025 च्या प्रश्नपत्रिकांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात आले आहेत. अखिल भारतीय 50% कोट्यासाठी अंतिम गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जाईल, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अधिकारी पात्रता आणि आरक्षण निकषांवर आधारित त्यांची गुणवत्ता यादी तयार करतील. निकाल आता जाहीर झाल्यामुळे, उमेदवार त्यांचे गुण कसे पहायचे हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. NEET MDS 2025 चा निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

NEET MDS 2025 Results Online कसा पहाल?

  • NBEMS ची अधिकृत वेबसाईट natboard.edu.in ला भेट द्या.
  • होमपेजवर "Examinations" वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन मेन्यू मधून "NEET MDS" वर क्लिक करा.
  • “Result of NEET-MDS 2025 Declared.” या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा User ID आणि Password वापरून लॉगिन करा.
  • आता तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल. तो डाऊन लोड करून ठेवा.

नक्की वाचा: Mumbai University Admission 2025-26: मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.  

आवश्यक कट-ऑफ गुण मिळवून NEET MDS 2025 परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी MDS अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र असतील. अखिल भारतीय 50% कोटा गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, तर राज्यनिहाय गुणवत्ता यादी संबंधित पात्रता आणि आरक्षण निकषांवर आधारित जाहीर केली जाईल. अर्जदारांना सल्लामसलत आणि जागा वाटप प्रक्रियेबाबत अपडेट्ससाठी नियमितपणे NBEMS वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.