Representational Image (Photo Credits: pixabay)

National Eligibility-cum-Entrance Test (UG) 2020:   वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS कोर्ससाठी आवश्यक असणार्‍या NEET या परिक्षेच्या ऑनलाईन अर्ज रजिस्ट्रेशनला आज (2 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. दरम्यान नॅशनल टेस्टींग एजन्सी कडून आज संध्याकाळी 4 वाजता अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवार ntaneet.nic.in वर आजपासून नीट परिक्षेसाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत. NEET 2020 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फी भरण्यासाठी 1 जानेवारी 2020 पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

NEET (UG) 2020:

NEET (UG) 2020 परीक्षा 3 मे 2020 दिवशी होणार असून इंग्रजी, हिंदी प्रमाणेच 11 भाषांमध्ये ही परीक्षा देता येणार आहे.

NEET 2020 Registration ऑनलाईन कसं कराल?

  • ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन लिंक उपलब्ध आहे.
  • होमपेज वर "NEET (UG) - 2020" registrations वर क्लिक करा.
  • यानंतर आवश्यक माहिती भरल्यानंतर लॉग ईन अकाऊंट बनवा.
  • आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन फी भरणं आवश्यक आहे. त्यानंतर सबमीट बटणवर क्लिक करा.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी किती?

जनरल आणि आरक्षण नसलेल्यांसाठी: 1500 रूपये

जनरल ईब्ल्यूएस/ ओबीसी :1400 रूपये

ट्रान्सजेंडर, एससी,एसटी, दिव्यांग : 800 रूपये

भारतातील अंडर ग्र्ज्युएट मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्ससाठी National Testing Agency (NTA)कडून नीट (NEET)परीक्षा घेतली जाणार आहे.