Mumbai University आता डिजिटली उपलब्ध करणार पदवीची प्रमाणपत्र; पहा कुठे पाहता येणार ही सर्टिफिकेट्स
online ((Photo Credits: Pexels)

मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) विद्यार्थी आता डिग्री सर्टिफिकेट्स डिजिटली देखील पाहू शकणार आहेत. Digi Locker वर आता 12 लाख विद्यार्थ्यांची डिग्री सर्टिफिकेट्स (Degree Certificates) उपलब्ध करून दिली आहेत. ही सर्टिफिकेट्स वेबसाईट्स वर रजिस्ट्रेशन करून आता विद्यार्थ्यांना त्यांची सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे. युजीसी ने National Academic Depository (NAD) Programme अंतर्गत सार्‍या शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक कागदपत्रं डिजी लॉकर्स (Digi Locker) वर उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच्या माध्यमातून सध्याच्या विद्यार्थ्यांना, जुन्या विद्यार्थ्यांना त्यांची सर्टिफिकेट्स ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये 5 विद्यापीठांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेट्स डिजिटली उपलब्ध करून दिली आहेत. डिजी लॉकर मध्ये पहिल्या टप्प्यात 24.88 लाख सर्टिफिकेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये 12.43 लाख सर्टिफिकेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये 2014 ते 2020 च्या सर्टिफिकेट्सचा समावेश आहे. डिजी लॉकरच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मागील 5 वर्षामधील अजून 5 लाख सर्टिफिकेट्स अपडेट करण्याचा मानस असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना कशी पाहता येणार सर्टिफिकेट्स ?

  • https://www.digilocker.gov.in/dashboard यावर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं. यासाठी आधार नंबर आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या रोल नंबर, सीट नंबर टाका.
  • त्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटच्या डाव्या बाजूला असलेला रजिस्ट्रेशन नंबर टाका.
  • त्यानंतर पूर्ण नाव लिहा.
  • पुढे तुमचं एक्झामिनेशन ईयर टाका. पुढे डिग्री सर्टिफिकेट तुम्हांला पाहता येईल.

मुंबई विद्यापीठाला यंदा ऑगस्ट महिन्यात NAAC कडून A++ मानांकन मिळालं आहे. हे महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद ( NAAC) संस्थेकडून मुंबई विद्यापीठास 3.65 गुणांसह हे मानांकन दिलं आहे.